राष्ट्रीय न्यूज

शाखा अभियंत्याचा त्रास, वायरमनने केला आत्महत्त्येचा प्रयत्न

माणगाव/महान कार्,दि. 2021-10-23- वीज वितरण कंपनीचे शाखा सहाय्यक अभियंता उमेश कदम यांच्या त्रासाला कंटाळून वायरमन या पदावर कार्यरत असणारे प्रशांत जाधव (रा. वसगडे, ता. करवीर) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने नागरिकांच्या लक्षात आले आणि दार मोडून त्यांना बाहेर काढले. साजणी (ता. हातकणंगले) येथे कदम रुजू झाल्यापासून माणगाव, माणगाववाडी, साजणी, तिळवणी, लक्ष्मी औद्योगिक वसाहत या ठिकाणी जाधव हे वायरमन म्हणून काम करत आहेत, त्यांना माणगावची ड्युटी आहे. कदम यांची मनमानी, अरेरावी, उर्मटपणा असा आरोप ठेवून त्यांनी आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला, असे सांगण्यात येत आहे.

जिल्हा बँक निवडणूक शुक्रवारी मोठ्या राजकीय घडामोडी

शिरोळ/महान कार्य ,दि. 2021-10-23- जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मोठ्या राजकीय घडामोडी कोल्हापूर, कुरुंदवाड आणि जयसिंगपुरात घडल्या आहेत. राजकीय नेत्यांनी तपशील सांगण्यास रात्री उशिरा नकार दिला. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर 11 ठरावधारक समुह नेत्यांना कंटाळून बाजूला जाण्याची शक्यता पुढे आली आहे, असे कळते.

आमच्यावर दबाव आणून लोकशाहीचा खून केला-आवळे

कुरुंदवाड/महान क,दि. 2021-10-23- कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयरामबापू पाटील यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यासाठी थिएटर चौकात कृती समितीचे नेते माजी नगरसेवक राजू आवळे आणि त्यांच्या समर्थकांनी मोर्चाला सुरुवात करताच मोर्चेकर्यांना याच ठिकाणी घेरले, एक इंचही मागे-पुढे करु दिले नाही. मोर्चा काढण्यापेक्षा नगरपालिकेत जा आणि चर्चा करा, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु नका, असा सल्ला पोलिसांनी दिली. यावेळी किरकोळ बाचाबाची सुरु झाली आणि अखेर पोलिसांनी सर्व मोर्चेकर्यांना पोलीस ठाण्यात नेले, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि काही काळानंतर सोडून दिले. या मोर्चात राजू आवळेंच्याबरोबर सुनिल कुरुंदवाडे, विलास उगळे, अर्शद बागवान व अन्य प्रमुख उपस्थित होते.

जयराम पाटील अंगार है, कृती समिती भंगार है-पाटील

कुरुंदवाड/महान क,दि. 2021-10-23- माजी नगरसेवक शिवसेना नेते राजू आवळे यांच्या नेतृत्वाखालील कृती समितीने नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या निवासस्थानावर शुक्रवारी मोर्चा आणण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याला रोखठोक जशास तसे उत्तर देण्यासाठी कुरुंदवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष विजय जयराम पाटील रस्त्यावर उतरले. पाटील यांच्यासोबत प्रचंड प्रमाणात त्यांचे समर्थकही रस्त्यावर आले आणि विजय पाटील यांनी यावेळी घोषणा द्यायला सुरुवात केली, ‘जयराम पाटील अंगार है, कृती समिती भंगार है’ असा सांगतच पाटील यांनी गंभीर इशारा दिला, प्रश्न शहराचे असतील तर नगरपालिकेत सोडवले जातात. व्यक्तीगत पातळीवर उतराला आणि घरावर मोर्चा काढायचा प्रयत्न कराल तर आम्हीही बांगड्या घातल्या नाहीत, आम्हीही राजकरणात आहोत, 40-50 वर्षे जनता जयराम पाटील यांच्या सोबत राहिली आहे. लोकशाहीत आम्हालाही अधिकार आहेत, त्या अस्त्रांचा आम्ही वापर करु. सोडणार नाही, सुट्टी देणार नाही, असा इशारा देत त्यांनी ज्या मार्गाने आवळेंचा मोर्चा येणार होता त्याच मार्गाने आगेकूच करायला सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी त्यांना सन्मित्र चौकात रोखले आणि पाटील व त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल केले.

एफआरपी अधिक 500 रु. घेतल्याशिवाय सोडणार नाही

शिरोळ,दि. 2021-10-23- मुश्रीफांचे आव्हान आम्ही स्विकारतो, द्या कारखाना चालवायला, 4 हजार दर देतो । जयसिंगपुरात ऊस परिषद घेतात आणि कारखानदारांच्या गाडीत बसून शिरोळ तालुक्यात फिरतात शिरोळ/महान कार्य वृत्तसेवा : गेल्या हंगामातील 200 रु. अद्यापही ऊस उत्पादकांना मिळाले नाहीत. या हंगामात एफआरपी अधिक 500 रु. साखर कारखानदारांना द्यावेच लागतील. यावर्षीची लढाई रस्त्यावरही असेल आणि न्यायालयीनही करु, कारखानदारांना जेरीस आणल्याशिवाय सोडणार नाही. दत्त कारखान्याच्या भानगडी सुरु आहेत, त्याविरुध्द आवाज उठवावाच लागेल. गावगुंड पुढारी करारपत्र घेऊन दारात येतील त्यावर सह्या करु नका, तर त्यांना निवडणुकीत पराभूत करा आणि ऐतिहासिक क्रांतीकारी ऊस उत्पादकांच्या लढ्यात सहभागी व्हा. ऊस उत्पादकांची दिशाभूल करुन चळवळीच्या नावाखाली फसवणार्या लबाड, ढोंगी पुढार्यांपासून सावध रहा. जयसिंगपुरात परिषद घेतात आणि शिरोळ तालुक्यात सारखर कारखान्याच्या चेअरमनच्या गाडीत बसून त्यांचाच प्रचार करत फिरता. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वाभिमानीला जे आव्हान दिले आहे ते का दिले, राजू शेट्टी आणि त्यांचे साटेलोटे आहे म्हणून, त्यांचे आव्हाने शेट्टी स्विकारणार नाहीत. मंत्री मुश्रीफ यांनी आम्हाला कारखाना द्यावा, आम्ही 4 हजार रु. प्रतिटन दर देतो. मुश्रीफांचे आव्हान खुलेआम स्विकारतो. पण, शेतकर्यांनी सावध रहायला हवे, असे आवाहन आंदोेलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी ऐतिहासिक पाचव्या एल्गार परिषदेत शिरोळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून केले आहे. धनाजी चुडमुंगे बोलताना म्हणाले, साखर कारखानदारांचे नेहमी रडगाणे असायचे, साखरेला दर कमी आहे आणि ऊस जास्त आहे त्यामुळे शेतकर्यांनी ऊसाचा दर मागू नये. असे प्रत्येक हंगामात ते तुणतुणे वाजवायचे. पण, यावर्षीचा हंगाम वेगळा आहे. दोन महिन्यापूर्वीपासून एफआरपी 3 टप्प्यात देणार असे वातावरण करायला त्यांनी सुरुवात केली आणि आज कारखानदारांनी एकरकमी एफआरपी जाहीर करायला सुरुवात केली आहे. याचे कारण वाढलेल्या साखरेच्या दरात आहे. कारखानदार आपल्यावर उपकार नाहीत, 2016-17 साली ऊस उत्पादकांना सुवर्णकाळ आला होता. यावर्षी आणि पुढच्या वर्षी असाच सुवर्णकाळ असणार आहे आणि दोन वर्षात ऊसाला चांगला दर मिळणार आहे. एफआरपी अधिक 200 रु. या कारखान्यांनी मागच्यावर्षी गाळप झालेल्या ऊसाला द्यायला पाहिजे होते ते अद्याप दिलेले नाहीत. सी. रंगराजन समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी आजही होत नाही. याचाच फायदा कारखानदार घेत आहेत आणि शेतकर्यांना लूटत आहेत. कारखान्यांचे हिशोब दोन महिन्यानंतर तपासून कारखान्यांना कायदेशीररित्या हे पैसे द्यावे लागतील आणि गेल्या वर्षीच्या 200 रु.साठीचा लढा सुरुच राहिला. भांडवलदारांचे लांगूलचालन करणार्या पुढार्यांनी दत्त कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला त्रास दिला आहे. पण, आम्ही अशा त्रासाला भिक घालणार नाही. बळजबरीला, गावगुंडांच्या धमक्यांना न जुमानता आंदोलन अंकुशचा लढा सुरुच राहणार आहे. शेतकर्यांनी थकीत एफआरपीचे व्याज मागायला शिकलेच पाहिजे. कारण, ते व्याज आमच्या हक्काचे आहे, श्रमाचे आहे. शेतकर्यांनी आज साथ दिली आहे, त्याचमुळे आपला लढा यशस्वी होत चालला आहे, अशीच साथ यापुढेही द्यावी. ही शिरोळची भूमी आहे, येथून चळवळी मोठ्या होतात, चार वर्षे आम्ही लढा देतोय आणि आज कारखाने वठणीवर आले आहेत. त्याचमुळे त्यांनी एकरकमी एफआरपीची घोषणा सुरु केलीआहे. याचे कारण आहे, एकतर साखरेचे वाढलेले दर आणि गेली चार वर्षे एफआरपी थकवली तर व्याज मागतो, कोर्टात जातो, तहसिलदारांच्या दारात बसतो म्हणूनच आज हे पोपटासारखे बोलत आहेत. अजूनही आमच्या तालुक्यातील दोन कारखाने मुर्दाडपणाने वागत आहेत त्यांना वठणीवर आणायचे आहेत, तुम्ही मला साथ द्या आणि खंबीरपणे लढण्यासाठी पुढे या. बी मोलॅसीसपासून इथेनॉल निर्माण करणार्या कारखानदारांना जाब विचारावा लागेल. पाच कारखान्यांनी 62.रु. 50 पैसे दर घेतला आहे, त्यांनी 650 रु. जास्त मिळविले आहेत. पण, ते ऊस उत्पादकांना देत नाहीत. रविवारी या दोन कारखान्यांचा आम्ही ऊस आडवू. शेतकर्यांचा दबाव कारखान्यांच्यावर रहायला

प्रत्येक गावात, शहरात जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तात्काळ सुरु करा

कोल्हापूर/महान क,दि. 2021-10-22- कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात, नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रात जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे सुरु करावीत, 15 नोव्हेंबरपर्यंत किमान 2 विरंगुळा केंद्रे सुरु करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जेष्ठ नागरिक समन्वय व संनियंत्रण समितीची बैठक पार पडली. जिल्हा समाजकल्याण अधिकारी दिपक घाटे आणि संबंधीत अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, विरंगुळा केंद्रामुळे जेष्ठांना एकत्र येण्याचे व आपला वेळ घालवण्याचे हक्काचे ठिकाण मिळेल.

अथणी शुगर्स भुदरगड युनिट एकरकमी एफआरपी, अल्पदरात साखर देणार

वेसर्डे/महान कार,दि. 2021-10-22- अथणी शुगर्स लि; भुदरगड (जि. कोल्हापूर) युनिट यंदाच्या हंगामात 2900 रु. एकरकमी एफआरपी ऊस उत्पादकांना देणार आहे. शिवाय प्रतिटन 1 किलो साखर 16 रु. किलोने सवलतीच्या दरात देणार आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक श्रीनिवास पाटील यांनी 6 व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ऊसाची मोळी गव्हाणीत टाकताना दिली आहे. गुरुवारी गव्हाणीत ऊसाची मोळी ऊस उत्पादकांच्या साक्षीने टाकण्यात आली. यावेळी श्री. पाटील बोलत होते. गव्हाणीचे पूजन कारखान्याचे एक्झि. डायरेक्टर योगेश पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य शेती अधिकारी एल.बी. देसाई यांच्या हस्ते काटापूजन झाले. चिफ इंजिनिअर नामदेव भोसले, बाबासाहेब देसाई, पी.व्ही. खटावकर यांनी मनोगते व्यक्त केली. लेबर ऑफिसर कन्हैय्या गोरे, जमीर मकानदार, शिवाजी खरुडे, सतिश पाटील, सुनिल घुगरे, जगदीश घोरपडे, दिग्विजय मुळीक, दिलीप गायकवाड, संताजी देसाई आदी उपस्थित होते. योगेश पाटील म्हणाले, कारखान्याने ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. ऊसाला चांगला दर मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. गेल्या 5 हंगातात वेळेत ऊस बिले आणि तोडणी वाहतुकीची बिले दिली आहेत. 4.5 लाख गाळपाचे उद्दीष्ट यावेळी आहे.

आज शिरोळात ऊस उत्पादकांची एल्गार परिषद; चुडमुंगेंच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष

शिरोळ,दि. 2021-10-22- ऊस उत्पादकांची पाचवी एल्गार परिषद शिरोळात शुक्रवार दि. 22 रोजी होत आहे. आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे ऊस उत्पादकांसाठी कोणती मागणी करतात? आंदोलनाची त्यांची दिशा काय असणार? कारखानदार ऊस उत्पादकाला कसे लुटतात, काही संघटनेचे नेते साखर सम्राटांना कसे मॅनेज होतात या सगळ्या भानगडी एल्गार परिषदेतून पुढे येणार असल्याने ऊस उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे. आंदोलन अंकुशने वेगवेगळ्या लढ्यातून ऊस उत्पादकांना न्याय मिळवून दिल्याने या खर्या लढ्याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.

शेतकरी अडचणीत असताना एकरकमी एफआरपी देणे हा शाहू पॅटर्न

कागल/महान कार्य व,दि. 2021-10-22- शेतकरी अडचणीत असताना एकरकमी ऊसाची एफआरपी देणे हा शाहू पॅटर्न आहे, असे मत छत्रपती शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजीत घाटगे यांनी 42 व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी गव्हाणीत ऊसाची मोळी टाकताना गुरुवारी सकाळी व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी लोकप्रिय निर्णयापेक्षा लोकहिताच्या निर्णयाला प्राधान्य दिले, व्यक्तीगत नुकसान सोसले. पण, कारखाना आणि शेतकरी हितासाठी तडजोड केली नाही. त्यांचे हे धोरण राज्यभर शाहू पॅटर्न नावाने पुढे गेले. हा पॅटर्नचा एक भाग आहे, असे त्यांनी म्हटले. यावेळी जेष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील, सौ. आशाराणी पाटील, मारुती निगवे, भारती निगवे यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. पी.डी. चौगले, सौ. हौसाबाई चौगले, अमरसिंह घोरपडे, सचिन मगदूम व कारखान्याचे संचालक, शेतकरी उपस्थित होते.

रविकांत तुपकर हे पात्र वैचारिक दिवाळखोरीतून निघालेले

शिरढोण/महान कार्,दि. 2021-10-22- रविकांत तुपकर हे स्वाभिमानी ऊस परिषदेतील पात्र वैचारिक दिवाळखोरीत निघालेले आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील मतदारांचा त्यांनी घोर अपमान केला आहे, त्यांना लाज वाटायला हवी होती, असा तिखट संताप विभागातील जेष्ठ नेते प्रा. चंद्रकांत मोरे यांनी गुरुवारी व्यक्त केला आहे. प्रा. मोरे खूप संतापले होते. ते म्हणाले, खासदार धैर्यशील माने यांनी कोरोना आणि महापुराच्या काळात केलेले काम, त्यानंतर खेचून आणलेला निधी, लोकसभेत या विभागाच्या नागरिकांचा त्यांनी उठवलेला आवाज हे कदाचित तुपकरांना बघवलेले दिसत नाही. स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत खासदार धैर्यशील माने यांच्यावर खालच्यास्तरावर जाऊन टिका केली, ते योग्य नाही. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील मतदारांचा त्यांनी घोर अपमान केला आहे. याच मतदारांनी यापूर्वी एकवेळ आमदार, दोनवेळा खासदार, एकवेळ जि.प. सदस्य केले होते. त्यांच्यावर आरोप करताना तुपकरांना जरातरी लाज वाटायला पाहिजे होती, असा प्रश्न करत प्रा. मोरे म्हणाले, एकरकमी एफआरपीच्या मुद्द्यावर शेतकरी आक्रमक होतील आणि ऊस परिषद यशस्वी होईल, असे संघटनेच्या नेत्यांना वाटत होते. पण, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी एफआरपीचे तुकडे करण्याचा कोणताही विचार नाही, असे लेखी पत्रानेच कळविले आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखानदारांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत मुद्दाच उरला नव्हता. प्रत्येकवर्षी काहीतरी नवीन मुद्दा पुढे करुन शेतकर्यांची दिशाभूल करायची, ऊस परिषदेच्या निमित्ताने शेतकर्यांना एकत्रित करायचे आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हे सुज्ञ ऊस उत्पादक आणि शेतकर्यांना समजल्याने ऊस परिषदेकडे ऊस उत्पादकांनी पाठ फिरविली आणि याचा परिणाम तुपकर आणि तथाकथीत शेतकरी नेत्यांचा जळफळाट झाला, त्यांची हवा गेली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला जनता पैसेही देते आणि मतही देते असा बडेजाव करायचा, माध्यमातून दिशाभूल करायची, चर्चा घडवून आणायची हा फंडा आता फसत चालला आहे, असे सांगत त्यांनी सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर विधानसभा मतदार संघात स्वाभिमानीच्या उमेदवाराला केवळ 1 हजार मते पडली. त्यामुळे यांचा बुरखाच फाटला आहे. जाईल तिथे अपयश त्यामुळे यांची वैचारिक दिवाळखोरी आता निघाली आहे. पण, तुपकरांनी लक्षात ठेवावे, एक बोलाल तर शब्दांचे दहा बाण सुटतील. संयम ठेवावा आणि आपले काम तेवढे सांगावे. तुपकर कुठे निवडून आले होते, तुपकरांना कुणी निवडून दिले होते मला अजून आठवत नाही आणि तुपकरांच्या आडून कोणी बोलण्याचा प्रयत्नही करु नये. 11 लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील माने, श्रीमती निवेदिता माने, स्व. बाळासाहेब माने यांना दिलेले जनतेने प्रेम हा इतिहास तुपकरांनी वाचावा. यश आले तरीही माने घराण्याने स्विकारले आणि अपयश आले तरीही ते हसत पचवले. जनतेला दोषी धरले नाही, तुम्ही जनतेला दोषी धरत चालला आहात, आज चुकलात, अशा चुका करु नका.[1] 2 3 > >>