कोल्हापूर न्यूज

घर, गोठे जमीनदोस्त; आर्थिक नुकसान

कसबा सांगाव,दि. 2021-06-19- महान कार्य वृत्तसेवा : शुक्रवारी दिनकर रामा पाटील धरणग्रस्त वायदंडे वसाहत (रा. कसबा सांगाव ता. कागल) यांचे घर आणि गोठा सतत पडणार्या पावसाने जमीनदोस्त झाले आहे. राहते घर आणि गोठा पूर्णपणे कोसळला आहे. ६० ५० लांबी रुंदी असलेल्या घराच्या भिंती ढासळल्या आहेत. ढिगार्याखाली दोन तिजोरी, दोन बंब, बेड, भांडीकुंडी आणि प्रापंचित साहित्य याचे आर्थिक नुकसान झाले आहे. गोठ्यात दोन दुभती जनावरं होती ती जखमी झाली आहेत. तात्काळ घटनास्थळी सरपंच रणजित कांबळे यांनी भेट दिली. तलाठी व कोतवाल यांनी पंचनामा केला. दोन लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. पाटील कुटुंबियांना यापूर्वीही एक एकर शेतातील ऊस आणि ठिबक पाईपलाईन जळून खाक झाली होती, नुकसान सहन करावे लागले होते. हा दुसरा आर्थिक घाला त्यांच्यावर आला. शासनाने मोठी मदत दिली पाहिजे, अशी मागणी होत आहे.[1]