कर्नाटक न्यूज

अथणी शुगर्स भुदरगड युनिट एकरकमी एफआरपी, अल्पदरात साखर देणार

वेसर्डे/महान कार,दि. 2021-10-22- अथणी शुगर्स लि; भुदरगड (जि. कोल्हापूर) युनिट यंदाच्या हंगामात 2900 रु. एकरकमी एफआरपी ऊस उत्पादकांना देणार आहे. शिवाय प्रतिटन 1 किलो साखर 16 रु. किलोने सवलतीच्या दरात देणार आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक श्रीनिवास पाटील यांनी 6 व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ऊसाची मोळी गव्हाणीत टाकताना दिली आहे. गुरुवारी गव्हाणीत ऊसाची मोळी ऊस उत्पादकांच्या साक्षीने टाकण्यात आली. यावेळी श्री. पाटील बोलत होते. गव्हाणीचे पूजन कारखान्याचे एक्झि. डायरेक्टर योगेश पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य शेती अधिकारी एल.बी. देसाई यांच्या हस्ते काटापूजन झाले. चिफ इंजिनिअर नामदेव भोसले, बाबासाहेब देसाई, पी.व्ही. खटावकर यांनी मनोगते व्यक्त केली. लेबर ऑफिसर कन्हैय्या गोरे, जमीर मकानदार, शिवाजी खरुडे, सतिश पाटील, सुनिल घुगरे, जगदीश घोरपडे, दिग्विजय मुळीक, दिलीप गायकवाड, संताजी देसाई आदी उपस्थित होते. योगेश पाटील म्हणाले, कारखान्याने ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. ऊसाला चांगला दर मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. गेल्या 5 हंगातात वेळेत ऊस बिले आणि तोडणी वाहतुकीची बिले दिली आहेत. 4.5 लाख गाळपाचे उद्दीष्ट यावेळी आहे.

११ निवडणूका जनता सोबत

कोल्हापूर ,दि. 2021-10-18- कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या निमित्ताने शिरोळ विधानसभा मतदार संघात कुणाशी तरी कोण फिरतं, कुणाची तर झुणका भाकरी ताक कोण तर खातं, कोणत्या तरी पेट्रोलपंपावर तेल घालतं. कुणाच्या भांडारमधला कुणाच्या रानामळात जातो आणि काही लोक तिथं जावून शाकाहारी आणि मांसाहारावर ताव मारतात. आचारी इचलकरंजीतून येतो. त्याचे नावही झाकून जाते. या जुन्याच खानावळीला नव्या पाहुणचाराने राजकीय चर्चेचा तोंड फोडले आहे. स्व. बाळासाहेब माने यांनी पाच लोकसभेच्या निवडणुका लढविल्या. कॉंग्रेस पक्षातील काही नेते थेट त्यांच्या विरोेधात असायचे. संघर्षही टोकाचा असायचा. स्व. माने यांच्याकडे साखर कारखाना, सूतगिरणी, सेवा सोसायटी, पतसंस्था असं काहीच असायचं नाही. याउपर कार्यकर्त्यांना आता जसं मळ्यात खानावळं चालतात अशी खानावळ चालवायला पैसे त्यांच्याकडे नसायचे. पण निवडणुकीत मोजकेच कार्यकर्ते शिरोळ विधानसभा मतदार संघात राबायचे. स्व. गजाननबापू पाटील, बबनराव जाधव, बाबा पाटील कनवाडकर, स्व. भगवानराव घाटगे, प्रा. चंद्रकांत मोरे, भैरू हंकारे, बाळासाहेब भांदिगिरे, लाला काका जाधव, गजानन मांजरे, बापू काशिराम पाटील, बाळ पाटील, जोतिराम खामकर, सुर्याजी खाडे, भिमराव पाटील, जयराम पाटील, चंद्रकांत नलवडे, बाळासाहेब शिंदे (दत्तवाड), सिजाउद्दीन मुल्ला, स्व. हरिश कांबळे यासारखे आणखीन काही आणि हे कार्यकर्ते प्रत्येक गावात जायचे. साधनंही यांच्याकडे नसायची. विरोधी उमेदवाराकडे सगळी साधनं असायची. त्यानंतर श्रीमती निवेदिता माने यांनी अपक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंगे्रस अशी निवडणूक १९९७, १९९८, १९९९, २००४ आणि २००९ अशा वेळेला लढवल्या. त्यांच्याकडे याच घराण्यातील काही कार्यकर्ते खंबीपणे उभारले. त्यानंतर श्रीमती माने यांचा पराभव झाला. राजकारणात त्या आता नाहीत. त्यांचा संपर्क कमी झाला असे दहा वर्षे सांगण्यात आले. दहा वर्षानंतर धैर्यशील माने हे लोकसभा निवडणुकीसाठी आले. आणि त्यांनी जिंकलं. या ११ विधानसभेच्या निवडणुकीत शिरोळ विधानसभा मतदार संघात जी मतं स्व. माने, श्रीमती माने आणि श्री. माने यांना मिळाली त्या त्या वेळी काही लोकांनी विरोध केला, विरोध करणार्‍यातले काही लोक त्यांच्या बाजूला आले. तर काही वेळेला सगळेच लोक त्यांच्या विरोधात गेले. ना साखर कारखाना, ना सूतगिरणी, ना बँक, पण एकूण लोकसंख्या, लोकसंख्येत झालेली वाढ, एकूण मतदान संख्येत झालेली वाढ, तेवढ्याच टक्क्याचा फरक त्यांना मिळणार्‍या मतात झाला आहे. श्रीमती माने आणि श्री. माने यांना मिळालेली शिरोळ विधानसभा मतदार संघातील मतं आणि त्या त्या काळात त्यांना मिळालेला पाठींबा आणि झालेला विरोध यामध्ये मोठी तफावत झालेली नाही. याचाच अर्थ माने परिवाराबरोबर ६५ हजाराचा मठ्ठा घेवून जाणारा एक वर्ग शिरोळ विधानसभा मतदार संघ कायम असल्याचे दिसते. कुणी तात्पुरती मैत्री कुणाबरोबर तरी करो किंवा कायमस्वरूपी करो, माने यांना मिळणार्‍या मतावर फारसा परिणाम होईल असे सध्याचे तरी चित्र नाही. लोकसंपर्क नाही, ते भेटत नाहीत, फोन उचलत नाहीत. कामात असतात. अधिकारी त्यांचे ऐकत नाहीत. पण ६५ हजारापासून शिरोळ विधानसभा मतदार संघात त्यांची मताची बेरीज सुरू होते. कुणी मधल्या काळात उसाचं कांडं हातात घेतले, दुधाच्या भांड्याला हात घातला. भांडण काढून विश्‍वासघात केला म्हटलं. आणि आता पुन्हा झुणका भाकरीच्या निमित्ताने गळयात गळा घालायचं चाललं. पण मूळ मानेंना पाठींबा देणारा झुणका भाकर केंद्राकडं फिरकायलाही तयार नाही. हे बदलल्या राजकारणात आजही पहायला मिळत आहे. प्रा. चंद्रकांत मोरे, भैरू हंकारे, स्व. लालाकाका जाधव, नलवडे, शिरोळचे पाटील या परिवारातल्या कोणत्याही घटकाला आजही राज्य सत्तेतले मोठे पद मिळालेले नाही. त्यांना मिळेल अपेक्षा त्यांनाही नाही. हे नेतेही तालुकाभर फिरत नाहीत. त्यांच्याकडेही साधनं अपुरीच आहेत. पण हीच मंडळी ६५ हजाराच्या पुढच्या बेरजेसाठी धावपळ करत असतात. घोषणेने नाही तर आम्ही मनाने स्वाभिमानी म्हणणारा वर्ग आजही माने यांच्या सोबत जिल्हा बँकेच्या निडणुकीच्या निमित्ताने राजकीय बदलाच्या वातावरणात आजही दिसून येत आहे. किरकोळ मतभेद, बैठकावर बैठका, पण निवडणुकीसाठी कायम नलवडे आणि घाटगे घराणं माने यांच्या सोबत राहिल्याचं आजवर पहायला मिळालं. जिल्हा मध्यवती बँकेच्या निवडणुकीत सध्यातरी माने यांना मानणारा शिरोळ विधानसभा मतदार संघातला वर्ग शांत, संयमी दिसत आहे. दूध संघ निवडणुकीतही तसाच तो दिसत होता. पण डॉ. सुजित मिणचेकर या शांत वातावरणात वादळासारखा गोकूळमध्ये पोहचला. श्रीमती निवेदिता माने यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅकेंचे अध्यक्षपदही भूषविले आहे. विद्यमान संचालिका आहेत. या निवडणुकीत उमेदवार असणार आहेत. तरीही माने गटाची कुठेही राजकीय आदळआपट सध्या जाणावत नाही. हीच खरी ताकद गटाच्या मजबुतीत असते असे मानले जात आहे.[1] 2 3 > >>