हातकणंगले न्यूज

शाखा अभियंत्याचा त्रास, वायरमनने केला आत्महत्त्येचा प्रयत्न

माणगाव/महान कार्,दि. 2021-10-23- वीज वितरण कंपनीचे शाखा सहाय्यक अभियंता उमेश कदम यांच्या त्रासाला कंटाळून वायरमन या पदावर कार्यरत असणारे प्रशांत जाधव (रा. वसगडे, ता. करवीर) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने नागरिकांच्या लक्षात आले आणि दार मोडून त्यांना बाहेर काढले. साजणी (ता. हातकणंगले) येथे कदम रुजू झाल्यापासून माणगाव, माणगाववाडी, साजणी, तिळवणी, लक्ष्मी औद्योगिक वसाहत या ठिकाणी जाधव हे वायरमन म्हणून काम करत आहेत, त्यांना माणगावची ड्युटी आहे. कदम यांची मनमानी, अरेरावी, उर्मटपणा असा आरोप ठेवून त्यांनी आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला, असे सांगण्यात येत आहे.[1] 2 3 > >>