Live News Channel 24 X 7

सावधान! नदी पात्रात वाढतेय पाणी

शिरोळ,दि. 2021-07-21- महान कार्य वृत्तसेवा : गगनबावडा, राधानगरी, चंदगड, आजरा, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा या कोल्हापूर जिल्ह्यातील 6 तालुक्यात मोठा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पुढचे चार दिवस सावध रहावे असा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ होत चालली आहे. भारतीय हवामान वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार मोठा पाऊस होईल, असे जलसंपदा विभागाचे अभियंता महेश सुर्वे यांनी सांगितले आहे. पुढचे चार दिवस पावसाचा जोर असेल असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, पुराचा धोका संभवत असल्याने नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले गेले आहे. पुढच्या 4 दिवसात रोज 70 ते 150 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते. डोंगराळ व अन्य भागातील नागरिकांना सुरक्षित राहण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Read more »